मी मरू की मुलीला मारू?

July 6, 2013 9:16 PM5 commentsViews: 3345

Posted by- दीप्ती राऊत, ब्युरो चीफ, IBN लोकमत,नाशिक

dipti_raut_ibn_lokmat_nashikप्रमिला कांबळेच्या मृत्युला अद्याप आठ दिवस पूर्ण झाले नाहीत. प्रमिलाच्या मारेकऱ्यांपर्यंत कायद्याच्या नाहीत, तरी समाजाच्या सुया नक्कीच पोहोचल्यात. आंतरजातीय विवाह केला म्हणून नाशिकमध्ये बापानं गरोदर मुलीची हत्या केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात पुढे आला आणि या आठवड्यात नाशिक पोलिसांकडे एक निवदेन आलं – मी मरू की मुलीला मारू?

पंचवटीत राहाणार्‍या अण्णा हिंगमिरेंच्या मुलीने जैन समाजात लग्न केले. तेव्हापासून भटक्या विमुक्त जोशी समाजाच्या जातपंचायतीनं त्यांच्यावर बहिष्कार घातला. आज अण्णांच्या पाठेपाठ सात-आठ कुटुंब पुढे आली आणि त्या सर्वांनी जोशी समाजाच्या जातपंचायतीविरोधात पोलिसांकडे तक्रारी दिल्यात. कुणाच्या मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून तर कुणाच्या बहिणीनं जातीबाहेर लग्न केलं म्हणून सगळ्यांवर जातपंचायतीनं बहिष्कार घातलाय. जातीचं नाव आणि बहिष्काराचं साधन. साध्य मात्र वेगळंच. त्यासाठी अनंत अत्याचार.

पंचवटीतील नागचौकातील भास्कर शिंदे या अखिल भारतीय जोशी समाज जात पंचायतीचे अध्यक्ष. त्यांच्यासोबत पाचजणांची पंचकमिटी. दर महिन्याच्या 25 तारखेला या पंचायतीची मिटींग होते. त्यात जातीचे विषय चर्चेला घेतले जातात. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जातीतून बहिष्कृत केलं जातं. त्यांच्या  लग्नसमारंभांना, अंत्यसंस्कारांना जातीतील लोकांनी जाण्यास मज्जाव घातला जातो. त्यांना समजातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई असते. प्रसंगी अंत्यसंस्कार शेजाऱ्यांच्या मदतीनं उरकावे लागतात. कुणी हे नियम मोडले तर 11 हजारांपासून 25 हजारांपर्यंत दंड केला जातो. इतकंच नाही तर या कुटुंबांमधील उपवर मुलामुलींच्या लग्नाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण, जात पंचायतीच्या धाकामुळे यांच्या कुटुंबासोबत कोणी सोयरिक करत नाही. इथेच हा विषय थांबत नाही. जातीबाहेर लग्न केलेल्या मुलांना मारून टाका किंवा तुम्ही मरून जा असा निर्णय जातपंचायत देते.

jaat panchyat4

असला हा आघोरी प्रकार कुठे दुर्गम मागास भागात नाही, तर नाशिकसारख्या विकसित शहराच्या पंचवटीसारख्या मध्यवर्ती भागात सुरू आहे. याच क्रूर प्रथेमुळे प्रमिलाचा जीवगेला. प्रमिलाने जातीबाहेर लग्न केल्यावर तिच्या वडिलांच्या कुटुंबावर एकनाथ कुंभारकर यांच्या कुटुंबावर याच जातपंचायतीनं बहिष्कार टाकला होता. पुढचं रामायण सगळ्यांच्या पुढे आहे.

नाशिक पोलिसांनी याबाबत तत्परता दाखवत जात पंचायतीच्या अध्यक्षांसह सहा पंचांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात मारहाणीस प्रवृत्त करणे, खंडणी उकळणे यासारखे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. जातपंचायतीचे हे पंच पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. सगळ्यांच्या बेरकी नजरा. आणि पोलीस स्टेशन बाहेर उभे असलेले वाळीत टाकण्यात आलेल्या कुटुंबांच्या भेदरलेल्या नजरा.

आता हा विषय फक्त सामाजिक राहिलेला नाही. जातीच्या नावानं पंच वसूल करत जात असलेल्या दंडाच्या रकमा आणि दंड भरला की पुन्हा जातीत घेण्याची प्रथा बघता यामागील बेकायदेशीर अर्थकरणाची मोठी किनार स्पष्ट होते. तेवढीच राजकारणाचीही. यांना अटक करताच पोलीस स्टेशनबाहेर नाशिकमधल्या राजकारण्यांच्या गाड्यांचे ताफे लागले. सर्वपक्षीय आजीमाजी पदाधिकारी येऊ लागले. दाखवायला कणव त्या पीडित कुटुंबांची होती, प्रत्यक्ष डोक्यात विचार मतांच्या राजकारणाचे होते. पंचवटीतील या नागचौकात या जोशी समाजाची बरीच घरं आहेत. बहुदा हजार- दीड हजार मतांची. पंचवटीतून निवडून येणाऱ्याला या जातपंचायतीचा महत्त्वाचा आधार. त्यात या जात कमिटीतील दोघे थेट राजकारण्यांशीच संबंधित. पंच कमिटीचे एक सदस्य मधुकर कुंभारकर मनसेचे नगरसेवक रुची कुंभारकर यांचे वडील तर अध्यक्ष भास्कर शिंदे हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनिता शिंदे यांचे सासरे.

आता बोला. प्रमिलेचे मारेकरी कोण कोण?

 • Akshay Chhajed

  Salute to all fighters!

 • Kalpana Charudatta

  प्रमिलेचे मारेकरी आपण सगळेच आहोत कारण बातम्या वाचून गप्प राहतो. जे या विरोधात चळवळ करतात त्यांना आपली कोणतीच मदत मिळत नाही. सध्या तर या प्रकारच्या बातम्या म्हणजे टि व्ही पाहणाऱ्या लोकांना अशा गोष्टी पाहण्यामध्ये करमणूक वाटते.
  मी रोज किमान एका तरी व्यक्तीला याबाबत जागे करण्याचा प्रयत्न करत असते का?

  • mahesh natu

   आपले विचार ऐकून बरे वाटले निदान हे बोलण्याची हिम्मततरी तुम्ही दाखवली या बद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. पण सध्या खरा प्रष्ण वेगळाच आहे जो सर्वांना माहीत आहे पण बोलण्याची कोणाची हिम्मत नाही ज्या पद्धतीने सध्या भारतात धर्माच्या नावावर आणि त्यांच्या मतांच्या नावाखाली घाणेरडे राजकारण खेळले जात आहे. असेच चालू राहिले तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी घरात गणपती आणायचा तर पोलिस परवानगी ज्ञावी लागेल.पुजा घालायची झाली तर धर्मगुरूंची परवानगी मागावी लागेल सहाजिकच ती ते देणार नाहीत कारण हिंदू धर्म बहुधा यांना संपवायचा आहे. बाकी काही नाही आपले जीवन आपण जगलो येणार्‍या लहान मुलांना काय बघावे लागणार आहे कोण जाणे..

  • Manoj Jadhav

   Kalpana tai tumi agdi brobr kaam krtat yet

 • Niranjan Takle

  This is shocking….earlier Brahmins used to exploit other castes…now, a new breed of exploiters has taken birth within the exploited castes….sad…freedom has no meaning until opportunities of exploitation are not eliminated.

close