राजूची कोठडी : सेबीच्या याचिकेवरील निर्णय पुढे ढकलला

January 19, 2009 7:34 AM0 commentsViews: 4

19 जानेवारीसेबीनं रामलिंग राजू यांच्या कोठडीसाठी केलेल्या याचिकेवरचा निर्णय 22 जानेवारीपर्यंत पुढं ढकलण्यात आला आहे. सेबीच्या या याचिकेविरोधात राजू यांचे वकील दुसरी याचिका दाखल करणार आहेत. राजू यांना बावीस जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सीआयडीदेखील आज रामलिंग राजू , बी सूर्यनारायण राजू आणि सीएफओ श्रीनिवास वदलामणी यांची चौकशी करणार आहे.सीआयडी रामलिंग राजूंचं इमेल अकाउंट तपासण्यासाठी सायबर एक्सपर्टची मदत घेणार आहे. राजूंच्या गेल्या तीन महिन्यातल्या इ-मेल्स आणि फोनकॉल्सचं रेकॉर्डची चौकशी पोलिसांकडूनही होणार आहे. तसंच राजूंच्या इतर 250 बेनामी खात्यांचीही कडक तपासणी होणार आहे.दरम्यान सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस म्हणजे सीएफआयओ ची सत्यम प्रकरणी चौकशी सुरू आहे. या चौकशीत सत्यमचा पैसा मेटास आणि आंध्रप्रदेशच्या काही स्थानिक कंपन्यामध्ये ट्रान्सफर केल्याचं आढळलंय. सूत्रांच्या माहितीनुसार या कंपन्याशी काही राजकिय नेत्यांचा संबंध आहे. सीएफआयओ सत्यमशी संबंधित व्यक्ती, कंपन्या तसंच कंपन्यांच्या संचालकांचीही चौकशी करणार आहेत. सत्यमच्या अकाऊंट्सची देखील सीएफआयओ कसून तपासणी करणार आहे.केंद्र सरकारनंही सत्यमच्या सर्व माजी संचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पावलं उचलली आहेत. या संचालकांपैकी कोणालाही यापुढे कोणत्याही कंपनीच्या बोर्डावर स्थान मिळू नये, अशी मागणी सरकारनं कंपनी लॉ बोर्डाकडे केली आहे. तसंच ऑडिटर फर्म प्राइसवाटर हाउस आणि कंपनी सेक्रेटरी यांनादेखील जबाबदार ठरवलं जावं असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

close