‘नीतिशकुमारांना जनता माफ करणार नाही’

July 6, 2013 10:17 PM0 commentsViews: 533

Image img_98032_nitishnarendra_240x180.jpg06 जुलै : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे 2014 निवडणुकीचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्यावर घणाघाती टीका केलीय. नीतिशकुमार यांना भाजपबरोबरची युती तोडल्यामुळे कधीही माफ केलं जाणार नाही असं मोदींनी म्हटलं. भाजप-जेडीयूचे संबंध खराब झाल्यापासून मोदींनी पहिल्यांदाच एवढं कठोर विधान केलंय. ते आज बिहारमधल्या कार्यकर्त्यांशी टेलीकाँफरन्सनी बोलत होते.

बिहारच्या जनतेनं एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं होतं. पण जेडीयूने 17 वर्षांची युती तोडून विश्वासघात केलाय. ज्या लोकांनी एनडीएसोबत विश्वासघात केला त्यांना जनता कधीच माफ करणार नाही अशा शब्दात मोदींनी परखड शब्दात नीतिशकुमारांचे नाव न घेता टीका केली. तर काँग्रेसवरही त्यांनी निशाना साधला. काँग्रेसचं जहाज हे बुडायला आलं आहे त्यामध्ये जी लोकं स्वार आहे, ती काँग्रेस मुक्त भारताला मुकणार आहे असंही ते म्हणाले. तसंच 2010 मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं रेटिंग राजकीय विश्लेषकांना समजलं नाही. जेडीयूने युती तोडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ बरखास्त केलं होतं. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पार्टीसाठी जे बलिदान दिलं ते वाया जाणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपचे प्रदर्शन संपूर्ण भारतात सगळ्यात चांगलं असणार असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

मोदींचा हायटेक संवाद

आज नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये बसून बिहार मधील एकाच वेळी 1,500 कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हे होऊ शकल ऑडिओ ब्रीज कम्युनिकेशनमुळे. या टेलीकाँफरन्समुळे एकाच वेळी 1,500 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी फोन वाजले आणि मोदींनी गुजरातच्या भाजप कार्यालयातून थेट संवाद साधला. हा कार्यक्रम पटनाच्या भाजपच्या कार्यालयात पार पडला.

close