महाबोधी मंदिरात 9 बॉम्बस्फोट,2 जखमी

July 7, 2013 2:10 PM0 commentsViews: 1045

7-july-maha7 जुलै : बिहार मधील बोधगयेमध्ये महाबोधी मंदिरात दहशतवाद्यांनी आज पहाटे साखळी स्फोट घडवून आणले आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास एकापाठोपाठ 9 बॉम्बस्फोट झाले असून पाचजण जखमी झाले आहे. जखमींमध्ये 2 भिख्यूंचा समावेश आहे. हे स्फोट 28 मिनीटात एकापाठोपाठ झाले. सर्व स्फोट कमी क्षमतेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

मंदिराजवळ दोन जिवंत बॉम्बही सापडले त्यांना निकामी करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 5 वाजून 40 मिनिटाने हे स्फोट झाले. यातील 3 स्फोट मंदिराच्या परिसरात झाले तर आठवा स्फोट भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीजवळ आणि 9 वा स्फोट बस स्थानकाजवळ झाला. या स्फोटांमुळे मंदिराला कोणतीही हानी झाली नाही. जखमींना मगधच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गृहमंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. गुप्तचर संघटनेनं या अगोदरचा महाबोधी मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे असा इशारा दिला होता. स्फोटानंतर संपूर्ण बिहारमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घटनास्थळी पोहचले आहे.

close