आकाश चोप्राच्या पुस्तकाचं प्रकाशन

January 19, 2009 8:40 AM0 commentsViews: 11

19 जानेवारी, दिल्लीपवित्रा सझावालआकाश चोप्राला भारतीय टीममध्ये आपलं स्थान टीकवण्यासाठी नेहमीच झगडावं लागलं. या संघर्षात वाट्याला आलेले अनुभव आता त्यानं पुस्तकरुपात मांडले आहेत. 'बियॉण्ड द ब्ल्यूज' या आपल्या पुस्तकाचं प्रकाशन त्यानं दिल्ली टीममधल्या आपल्या काही साथिदारांच्या उपस्थीत केलं.एक दशकाच्या आपल्या मोठ्या कारकिर्दीत आकाश चोप्राने अनेक गोष्टी पाहिल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या चढउतारापासून ते स्थानिक क्रिकेटमधल्या काही चांगल्या कामगिरीपर्यंत. आणि आता या सगळ्या गोष्टींच्या आठवणी त्यानं आपल्या पुस्तकातून लोकांपुढे ठेवल्यात. 'बियॉण्ड द ब्ल्यूज' या त्याच्या पुस्तकात फर्स्ट क्लास क्रिकेटमधला प्रवास आणि अनुभव त्यानं मांडले आहेत. "या पुस्तकात जे सत्य आहे, तेच मांडलंय. भारतात क्रिकेट खेळणं किती अवघड आहे, ते मी पुस्तकात मांडलं आहे." असं आकाशचोप्रा म्हणाला. त्याचा दिल्ली संघातला सहकारी गौतम गंभीरनंही आकाशचं भरपूर कौतुक केलं. "आकाश खूप चांगला वक्ता आहे. तो उत्तम लेखकही आहे. त्याचं पुस्तक नक्कीच चांगलं असणार." असं तो म्हणाला. 31 वर्षीय आकाश चोप्रा नाराज आहे आणि ते स्वाभाविकच आहे. या मोसमात चोप्राने 1700 रन्स ठोकले. असं असुनसुद्धा भारतीय सिलेक्टर्सनी त्याची कामगिरी विचारात घेतलेली नाही. एवढंच नाही तर बीसीसीआयनेही त्याच्याबरोबरचा करार रद्द केलाय. पण असं असलं तरीही त्याने आशा सोडलेली नाही. "मी जर चांगला खेळ केला तर मला पुन्हा संधी मिळू शकेल" असं आकाश चोप्रा म्हणाला.आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरंच वयाचं बंधन असतं? का आकाश चोप्रा भारतीय क्रिकेट टीममध्ये पुनरागमन करू शकेल ? "ते तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतं. तुम्ही चांगली कामगिरी केलीत, तर तुम्ही नक्कीच स्थान मिळवू शकता." असं गौतम गंभीरनं सांगितलंगंभीरने सांगितलेलं खरं होईल की नाही हे आपण सांगू शकत नाही. पण आपल्या जीवनात त्याने नवीन इनिंगला सुरूवात केलीय हे मात्र नक्की.

close