बोधगया स्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात?

July 8, 2013 2:42 PM0 commentsViews: 314

MAHABO08 जुलै : बिहारमध्ये महाबोधी मंदिरात झालेल्या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याच्या संशयाला आणखी बळकटी आली आहे. यासंबंधीचं सीसीटीव्ही फुटेज आज पोलिसांनी प्रसिद्ध केलं. या स्फोटांप्रकरणी पोलिसांनी रविवारी एकाला गयामधून ताब्यात घेतलंय.

 

याप्रकरणी म्यानमारमधल्या संघर्षाचा काही संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, आज विशेष प्रार्थनेनंतर संध्याकाळी पाच वाजता बोधगया मंदिर दर्शनासाठी खुलं होणार आहे. महाबोधी मंदिराबाहेर घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम आणि गंधकाचा वापर करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. रविवारी पहाटे महाबोधी मंदिरात कमी शक्तीचे 9 बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 2 भिख्यू जखमी झाले होते. स्फोटानंतर गृहमंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं होतं.

close