पुण्यात मनसेचा धक्का, विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे

July 8, 2013 1:18 PM0 commentsViews: 2570

mns vs congress08 जुलै : पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत मनसेला धक्का बसलाय. विरोधीपक्षनेतेपद मनसेच्या हातातून निसटून काँग्रेसकडे गेलंय. प्रभाग क्रमांक 40 अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके विजयी झाल्या आहेत. मनसेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांचं जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं त्यांचं नगरसेवकपद्द रद्द झालं होतं.

त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या प्रभागातून मनसेच्या इंदुमती फुलावरे, महायुतीच्या संध्या बरके आणि राष्ट्रवादीच्या नीलम लालबीगे रिंगणात होत्या.

तर पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 35 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रद्धा लांडे विजयी झाल्यात. महायुतीच्या सारीका कोतवाल यांचा त्यांनी पराभव केलाय. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं. त्यामुळे इथं पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

close