अंधेरीत 36 जणांना विषबाधा

January 19, 2009 7:00 AM0 commentsViews: 7

19 जानेवारी, मुंबईमुंबईतील अंधेरी भागात एका लग्नसमारंभात 36 जणांना विषबाधा झाली आहे. अंधेरीतल्या गावदेवी भागात ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. विषबाधा झालेल्यांपैकी 7 जणांना प्राथमिक उपाचारांनंतर घरी सोडण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून 29 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आलं. यात 10 मुलं, 9 स्रिया आणि 10 पुरुषांचा यांपैकी कोणाचाही प्रकृती चिंताजनक नाही.

close