भाईंदर : पोटनिवडणुकीत भाजपच्या सीमा शहा विजयी

July 8, 2013 6:47 PM0 commentsViews: 338

mira bahindar coropration08 जुलै : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत वॉर्ड 36 मध्ये भाजपच्या सीमा शहा विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वर्षा गोपानी यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादीच्या सीमा जैन या 859 मतांनी तिसर्‍या स्थानावर आहेत. सीमा जैन या आधी भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. पण अंतर्गत वादातून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या विजयामुळे भाजपनं आपली जागा कायम राखली आहे.

close