सिकंदराबादमध्ये इमारत कोसळून 10 ठार

July 8, 2013 6:56 PM0 commentsViews: 44

sikandrabad08 जुलै : आंध्र प्रदेशात सिकंदराबादमध्ये सिटी लाईट हॉटेलची इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. इमारतीच्या ढिगाराखाली वीस जण  अडकल्याचा अंदाज असून बचाव कार्य सुरु आहे. इमारत कोसळण्याच कारण अद्याप स्पष्ट झालेल नसलं तरी मुसळधार पावसामुळे ही जुनी इमारत कोसळ्याचं मानल जातंय. हॉटेलची ही इमारत भर वस्तीत होती. या घटनेमुळे सिकंदराबादकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती.

close