ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया मिर्झा दुसर्‍या फेरीत

January 19, 2009 10:06 AM0 commentsViews: 22

19 जानेवारीभारताच्या टेनिसस्टार सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली आहे. पहिल्या फेरीत सानियाने पोलंडच्या मार्टा डोमाचोव्क्साचा 6-1, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी सानियाने स्पर्धेच्या तिसर्‍या राऊंडपर्यंत मजल मारली होती. सानियाची ती ऑस्ट्रेलियन ओपनमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. गेल्या वर्षी दुखापतींनी सतावल्यामुळे सानिया टेनिस क्रमवारीतही पहिल्या शंभर खेळाडूंतून बाहेर फेकली गेली होती. पण आपला खेळ उंचावत आता सानियानं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आगेकूच केली आहे.

close