मुंबईकरांची स्वस्त भाजी राजकारणात ‘फस्त’

July 8, 2013 9:21 PM0 commentsViews: 372

08 जुलै : आजपासून मुंबईमध्ये स्वस्त दरात भाजीपाला आणि फळं देण्याची योजना सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. दहा स्वस्त भाजी विक्री केंद्र आजपासून सुरु होणार होती. पण, मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई बाहेर असल्यानं सरकारला ही योजना सुरु करता आली नाही. विशेष म्हणजे मुंबईतल्या आणखी छत्तीस स्वस्त भाजी विक्री केंद्रांची यादी मुंबई प्रदेश काँग्रेसनं राज्य सरकारकडे दिलीय. तसंच 110 हाऊसिंग सोसायट्यामंध्ये सुद्धा स्वस्त भाजी केंद्र सुरु करण्याची यादी प्रदेश काँग्रेसनं दिलीय. त्यामुळे बुधवारपर्यंत एकूण दीडशे ठिकाणी स्वस्त भाजी विक्री केंद्र सरकार सुरू करू शकणार आहे. पण विक्री केंद्र काँगे्रसनं निश्चित केल्यामुळे सरकारची ही योजना नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जातेय. असा प्रश्न उपस्थित झालाय.

close