फुले बाजारातल्या मॉलमध्ये दुकानदारांना हवी जागा

January 19, 2009 12:34 PM0 commentsViews: 1

19 जानेवारी, नागपूर प्रशांत कोरटकरविदर्भातला मोठा बाजार म्हणजे नागपूरचा फुले बाजार. नागपूर महानगरपालिका फुले बाजाराचा कायापालट करणार आहे. फुले बाजारच्या जागी नागपूर महानगरपालिका तिथे मॉल उभारणार आहे. पण या मॉलला फुले बाजारातल्या दुकानदारांनी विरोध केला आहे.1967 साली विदर्भातला सर्वात मोठा भाजीबाजार म्हणजे फुले बाजार अस्तित्वात आला. रोजच्यारोज 25लाखांची गरज फुले बाजारातून भागवली जाते. त्यामुळे हजारोंची पोटं बाजारातल्या रोजंदारी वर चालतात. गेल्या 40 वर्षांपासून इथला प्रत्येक दुकानदार आपापली जागा पकडून भाजीचा व्यापार करतोय. सोमाजी शंभरकरही त्यापैकीच एक. या सोमाजी शंभरकरांना सध्या भीती वाटतेय ती महापालिकेनं इथं मॉल उभारण्याचं ठरवल्यामुळं. त्याचं कारण सोमाजी शंभरकर सांगतात, " आम्ही रोज कमावतो रोज खातो. पण या मॉलचा आम्हाला काहीच फायदा होणार नाही. महापालिका आम्हाला मंडईच्या ऐवजी तयार होणा-या मॉलमध्ये जागा देईल असं काही वाटत नाहीये. " मंडईच्या जागेवर मॉल बांधण्याचा महानगरपालिकेचा विकास आराखडा केव्हाचाच तयार झाला आहे. तशी माहिती नागपूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कृष्णराव खोपडे यांनी दिली. मात्र इथं उभं राहणार्‍या मॉलला सगळ्याच दुकानदारांनी विरोध करण्याचं ठरवलं आहे. मॉलच्या योजनेच्या विरोधात भाजीविक्रेत्यांनी जहर खाओ आंदोलन सुरू केलं आहे. दुकानदारांच्या विरोधाची कारणंही स्पष्ट आहेत. फुलेबाजाराला लागूनच कोट्यवधींच्या 'एम्पे्रस सिटी मॉल'चं खाजगी बांधकाम सुरू झालं आहे. त्यामुळं बिल्डर लॉबीलाच मदत करण्याचा हा डाव असल्याचं दुकानदारांनी म्हटलं आहे. " आज 10 ते 20 वर्षानंतर यांना स्वन पडलं आहे. हा तर राजकीय नेत्यांचा आणि कंपनीचा स्वार्थ आहे," असं मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कृष्णराव खोपडे यांचं म्हणणं आहे. जर मॉल झाला तर 25 हजार दुकानदारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

close