आता राजकारणाचाही ‘स्फोट’

July 8, 2013 10:35 PM0 commentsViews: 439

08 जुलै : बोधगयात दहशतवादी हल्ल्यानंतर आता त्याचं राजकारण सुरू झालंय. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी आज भाजप आणि नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. अजून तपास पूर्ण व्हायचा आहे, त्याआधीच भाजप काही विशिष्ट संघटनांनाच का टार्गेट करतंय असा सवाल त्यांनी विचारलाय. भाजपनंही दिग्विजयना उत्तर दिलंय. दिग्विजय व्होटबँकेचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. पण, हा आरोप फेटाळून लावत दिग्विजय सिंग यांनी भाजपनंच राजकारण सुरू केल्याचा उलटा आरोप केलाय. दुसरीकडे बिहारमध्ये भाजप आणि राष्ट्रीय जनता दल अभद्र युती करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी केला आहे.

close