मुंबई महापालिकेची पोटनिवडणूक शिवसेनेनं जिंकली

January 19, 2009 9:35 AM0 commentsViews: 13

19 जानेवारी मुंबईमुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 160 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे कमलाकर नाईक 915 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक शांताराम नाईक यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती. वॉर्ड क्रमांक 160 हा कुर्ला नेहरूनगर भागात येतो. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चुरस सुरू होती. शिवसेनेचे कमलाकर नाईक 8564 मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सदानंद थोरात यांचा पराभव केला. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 85, भाजपचे 29, राष्ट्रवादीचे 14, काँग्रसेचे 81 आणि मनसेचे 6 तर समाजवादी पक्षाचे 7 आणि अरूण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेच्या 2 जागा आहेत. शिवसेना आणि भाजप युतीचं बलाबल आता 114 आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे 110 नगरसेवक आहेत. पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कमलाकर नाईक यांचा विजय झाल्यानं आता सेना भाजपच्या 114 जागा झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेतली शिवसेनेची सत्ता शाबूत राहिली आहे.

close