आसाममध्ये पुराचा हाहाकार

July 9, 2013 3:06 PM0 commentsViews: 555

asam floods309 जुलै : आसाममध्ये पूरस्थिती आणखी भयानक होत चालली आहे. 11 जिल्ह्यातल्या सुमारे सव्वाचारशे गावांचा संपर्क तुटलाय आणि पुरामुळे 1 लाखांहून जास्त जण विस्थापित झाले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्याशी या परिस्थितीबद्दल चर्चा केली आणि केंद्राकडून देण्यात येणार्‍या मदतीतही वाढ केलीये. गरज पडल्यास, मदतकार्यासाठी लष्कराची मदत घेतली जाणार आहे. मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्यातला जवळपास 70 टक्के भाग पाण्याखाली गेलाय. तर ब्रम्हपुत्रा नदीनं धोक्याची पातळी केव्हाच ओलांडलीये.तर धेमजी जिल्ह्याला या पुराचा सगळ्यांत जास्त तडाखा बसलाय. या जिल्ह्यातला 68 गावांना आणि 11 हजार 700 लोकांना याचा तडाखा बसल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

close