रुपयाची एकसष्टी सुटली, ‘साठी’ गाठली

July 9, 2013 1:42 PM0 commentsViews: 189

Image img_183022_rupeessdollor_240x180.jpg09 जुलै :आंतराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या घसरण होऊन सर्वाधिक निचांकी दर गाठला होता. मात्र आज किंचितसा दिलासा मिळाला. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर रुपया किंचित वधारून त्याची किंमत डॉलरमागं 59 रुपये 80 पैसे इतका झाला. काल त्यानं 61 रुपये 21 पैसे अशी आतापर्यंतची निचांकी पातळी गाठली होती. रुपयाला सावरण्यासाठी सोमवारी सेबी आणि आरबीआयनं नियम कठोर केले, त्यामुळे रुपया किंचीत सावरला गेला.रूपयाची घसरण होऊन डॉलरमागं 60 रुपये 95 अशी निचांकी पातळी गाठली. शुक्रवारी रुपया 60 रुपये 23 पैशांवर बंद झाला होता. यापूर्वी रुपयाने 60 रुपये 76 इतका निचांक गाठला होता.

close