कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द

January 19, 2009 11:41 AM0 commentsViews: 7

19 जानेवारी कोल्हापूरप्रताप नाईककोल्हापूर महापालिकेत होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची करण्यात आलेली धरपकड आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा उधळून टाकण्याच्या निषेधार्थ ही सभा रद्द करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांनी, घोषणाबाजी केली. बेळगावमध्ये मराठी माणसांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध सर्वत्र करण्यात येत आहे. तसाच तो कोल्हापूर महापालिकेतही करण्यात आला. सीमावर्ती भागात झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सर्वसाधारण सभा रद्द करावी अशी मागणी महापालिकेच्या नगरसेवकांनी महापौरांकडे केली. महापौरांनीही सर्व नगरसेवकांसह शिवाजी चौकात जमून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात घोषणबाजी केली. बेळगावात होणा-या प्रत्येक आंदोलनाला कोल्हापूरच्या नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. यापुढेही सीमावर्ती भागातील मराठी माणसांना पाठिंबा राहील असं यावेळी घोषित करण्यात आलं. आता कोल्हापुरातील सामाजिक संस्थाही या आंदोलनात सामील होणार असून केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सीमावर्ती भागातील प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी करण्यात येणार आहे.

close