भाजप नेत्यांनी महाबोधी मंदिराला दिली भेट

July 9, 2013 4:21 PM0 commentsViews: 105

09 जुलै :बोधगयामध्ये महाबोधी मंदिर परिसरात स्फोट झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांनी मंदिराला भेट दिली. काँग्रेस सीबीआय, आयबीसारख्या संस्थांचा गैरवापर करत असल्यामुळेच असे स्फोट होत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी यावेळी केला. भाजपच्या नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही टीका केलीये. राज्यात भाजप सरकारमधून बाहेर पडल्यानं सरकार कमजोर पडल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय.

close