मुख्यमंत्र्यांना दिल्लीतला बंगला सोडावा लागणार?

July 9, 2013 5:02 PM1 commentViews: 604

09 जुलै : सरकारी अधिकारी, मंत्री आणि न्यायाधीशांनी बेकायदेशीर पद्धतीने बळकावलेल्या बंगल्यांवर सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढत निवृत्त झाल्यानंतर महिन्याभरात सरकारी बंगले खाली करावे असे आदेश अलीकडेच सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही दिल्लीतला सरकारी बंगला सोडावा लागणार आहे.

दिल्लीत 11, रेसकोर्स रोडवर त्यांच्या नावे हा बंगला आहे. मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयात काम करत असताना त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दिल्ली सोडावी लागली. पण त्यांनी बंगला सोडला नव्हता. त्यानंतर पंतप्रधानांची सुरक्षा यंत्रणा एसपीजी टीमने बंगला सोडावा अशी सूचना केली होती. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बंगला सोडला नाही. मुख्यमंत्र्यांचा बंगला हा सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना देण्यात आलेल्या बंगल्यासारखाच आहे. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा बंगला सोडावा लागणार हे स्पष्ट झालंय मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनाही लागू होतो का? याबद्दल मतभेद आहेत.

 
दरम्यान,मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासंदर्भात त्यांच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय.
‘सदर बंगला आम्हाला केंद्राच्या हाऊसिंग सब कमिटीनं दिलाय. सब कमिटीनं हा बंगला महाराष्ट्र सरकारला अधिकृरित्या दिलाय. सीपीडब्यूच्या यादीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चुकून आलंय. याबाबत सीपीडब्यूला कळवलंय.’

  • vijay bavdekar

    सन्माननीय मुख्य मंत्र्यांनी निरर्थक वाद विवादात न पडता बंगला सोडून
    द्यावा व खरा खरा आदर्श घालून द्यावा अशी त्यांना नम्र विनंती .

close