बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा-उद्धव ठाकरे

January 19, 2009 1:58 PM0 commentsViews:

19 जानेवारी जळगावबेळगावला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथं शिवसेनेच्या शाखा उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटकातील भाजप सरकारला आवरावं असा विनंतीवजा इशाराही त्यांनी यावेळी अडवाणींना दिला. भाजपसोबतची युती तोडण्याची रामदास कदम यांची भूमिका शिवसेनेचीच असल्याचंही ते यावेळी म्हणाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, नुकत्याच कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत मराठी माणसांची मतं विभागली गेली. त्यामुळे मराठी माणसांचा आवाज उठवणारा एकही आमदार तेथे राहिला नाही. हे जरी खरं असलं तरी कर्नाटकात सरकार कुणाचही असो मग ते काँग्रेस, जनता दलाचं किंवा भाजपचं असो ते तिथल्या नागरिकांच्या भावनांचा विचार न करता एकतर्फी निर्णय घेतं. तिथल्या सीमावर्ती मराठी माणसांवर दडपशाही करत असतं असं ते यावेळी म्हणाले.जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडून मागून त्याजागी सुरेश जैन यांना उमेदवारी देण्यास शिवसेना अनुकूल असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.

close