ओबामांच्या शपथविधीची जोरदार तयारी

January 19, 2009 3:23 PM0 commentsViews: 2

19 जानेवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामांची निवड अमेरिकन जनतेनं केली. मंगळवारी त्यांचा शपथविधी समारंभ होत आहे. बराक ओबामा 20 तारखेला व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. ओबामाच्या शपथविधीला अजून वेळ असला तरी त्यांचं सेलेब्रेशन सुरू झालं आहे. ओबामांनी 56 व्या प्रेसिंडेन्शियल कॉन्सर्टमध्ये भाग घेतला. ओबामांच्या 'वी आर वन' भाषणानं या सेलेब्रेशनची सुरुवात झाली.अमेरिका सध्या मंदी आणि दहशतवाद या दोन शत्रूंशी लढत असली तरी लवकरच यावर विजय मिळवू असं ओबामांनी यावेळी सांगितलं. या इनॉगरल कॉन्सर्टमध्ये बियॉन्से, शकिरा, जिमी फॉक्ससारख्या कलाकारांचे म्युझिकल परफॉर्मन्सेस झाले.या कार्यक्रमाविषयी बोलताना बराक ओबामा म्हणाले, इथे परफॉर्म करणा-या प्रत्येकाचे मी आभार मानतो.अमेरिकेबद्दलच्या भावना त्यांनी गाण्यातनं आणि शब्दांतून व्यक्त केल्या आहेत. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या नवीन सुरुवातीत तुम्हा सगळ्याचं स्वागत.

close