गजानन महाराजांची पालखी उस्मानाबादेत

July 9, 2013 5:52 PM0 commentsViews: 109

09 जुलै : आज शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं उस्मानाबाद शहरात आगमन झालं. यावेळी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील भाविकांनी एकच गर्दी केली होती. आज पालखीचा मुक्काम शहरात आहे. उद्या पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी उस्मानाबाद शहरातील रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या पालखीत तीन अश्व आणि पालखीचे मुख्य गज हे गजानन महाराजांच्या पालखीचे मुख्य आकर्षण असते.

close