शौर्यपदकांसाठी 20 नावांना मंजुरी

January 19, 2009 3:34 PM0 commentsViews: 1

19 जानेवारी दिल्लीमितु जैन शौर्य पुरस्कारासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे 73 जणांची नावं पाठवली होती. त्यातील जवळपास 50 जणांची यादी केंद्रानं परत पाठवून त्यांनी केलेल्या धाडसी कामगिरीचा अहवाल मागवला आहे. म्हणजे या यादीतील केवळ 20 जणांच्या नावाला मंजुरी मिळाली. असं असलं तरी सर्वोच्च शौर्य पुरस्कार कसाबला जिवंत पकडताना शहीद झालेल्या पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना मोठी किंमत मोजावी लागली. देशानं त्यांचं बलिदान विसरू नये यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्रासाठी महाराष्ट्रातील 2 पोलिसांची नावं पाठवली आहेत. त्यात आयएसआय तुकाराम ओंबळे यांचा समावेश आहे. त्यांनी एके 47 ची गोळी स्वत:च्या अंगावर झेलली यामुळे कसाबला जिवंत पकडणं शक्य झालं. कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनाही अशोक चक्र मिळावं तसंच इतर 6 जणांना कीर्ती चक्र मिळावित असा प्रस्ताव आहे. यात एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे आणि त्यांचे सहकारी विजय साळसकर यांचा समावेश आहे. 7 पोलिसांना मरणोत्तर राष्ट्रपती पदकं मिळतील. हल्ल्याच्या वेळी शहीद झालेल्या 15 पोलिसांना अशोक चक्र मिळावं अशी सरकारची मागणी आहे. ती यादी आता 8 पर्यंत कमी करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले, आम्ही नावं पाठवली आहेत. शौर्य पुरस्कार कोणाला मिळणार याचा निर्णय केंद्र घेणार आहे. तरीही एका वर्षात एवढे पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुस्करांची ही यादी सध्या राष्ट्रपतींकडे आहे. येत्या काही दिवसातच शौर्यपदक मिळालेल्या पोलिसांची नावं जाहीर होतील.

close