टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेत मुंबईवर अन्याय

January 19, 2009 5:06 PM0 commentsViews: 2

19 जानेवारी मुंबईश्रीलंकेविरुद्धच्या पाच वन-डेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली. त्यात रवींद्र जडेजा आणि प्रविण कुमारला संधी देण्यात आली. पण पुन्हा एकदा मुंबईच्या खेळाडूंकडे कानाडोळा केल्यामुळे समितीच्या एकूणच निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रवींद्र जडेजाने रणजी स्पर्धेत बॉलिंग आणि बॅटींगमध्ये ऑल राऊंडर कामगिरी करत निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. मिळालेल्या संधीवर जाडेजाही खूश आहे.पण या रणजी मोसमात अजून काही नवोदित खेळाडूंनी आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला. मुंबईच्या धवल कुलकर्णीने 9 मॅचेसमध्ये तब्बल 42 विकेट घेत मोसमातील सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर म्हणून मान पटकावला. पण असं असतानाही टीममध्ये उत्तर प्रदेशच्या प्रविण कुमारला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. प्रविण कुमारने या रणजी मोसमात 7 मॅचेसमध्ये एकुण 18 विकेट्स घेतल्या. म्हणजे धवलच्या तुलनेत प्रविणचा हा परफॉमन्स अगदी सामान्य आहे. धवल कुलकर्णीने यावर्षात सातत्याने कामगिरी केली. पण तरीही त्याची भारतीय टीममध्ये वर्णी लागू शकली नाही. यावरून निवड समितीमध्ये पश्चिम विभागाचं प्रतिनिधीत्व करणा-या सुरेंद्र भावे यांना इतर निवड समिती सदस्यांना आपल्या प्लेअर्सची बाजू पटवून देता येत नसल्याचं दिसतंय. पण याचा फटका मात्र मुंबईच्या खेळाडूंना बसतोय हे मात्र नक्की.

close