मुंबईकरांना मिळणार स्वस्त भाजी

July 9, 2013 8:13 PM0 commentsViews: 217

08 जुलै : मुंबईतल्या किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर लवकरच 100 भाजी विक्री केंद्र राज्य सरकारतर्फे सुरू केली जात आहे. मुंबई ,ठाणे, कल्याण भागात आज 4 वाजल्यापासून अपना बाजार आणि सहकार बाजारातील केंद्रावर ही स्वस्त भाजी केंद्रे सुरू झाली आहे. आणि बाकी केंद्र टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत. नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमधून घाऊक बाजारात भाजी खरेदी करून ती त्याच दरात मुंबईतील या केंद्रावर विकली जाणार आहे. त्यामुळे सध्या असलेल्या भावापेक्षा 30 टक्के कमी दरात मुंबईकरांना भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
मुंबईतली स्वस्त भाजी केंद्र
– अपना बाजार – हिंदमाता टॉकीज, नायगाव-दादर
– अपना बाजार – सरदार नगर क्र.1, सायन कोळीवाडा
– अपना बाजार – टिळकनगर, चेंबूर
– अपना बाजार – आरसीएफ कॉलनी, चेंबूर
– अपना बाजार – पंतनगर पोलीस स्टेशन, घाटकोपर
– अपना बाजार – आझाद नगर, अंधेरी
– अपना बाजार – जे.एल. नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम)
– सुपारी बाग कन्झ्युमर को-ऑप.सोसायटी, लालबाग-परळ
– अपना भंडार, शंकरराव चौक, नगर परिषद शाळा, कल्याण (पश्चिम)
– सहकार बाजार, कळवा-ठाणे

close