आ.विनायक निम्हण यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल

July 9, 2013 9:41 PM2 commentsViews: 1157

am nimhankar09 जुलै : पुण्याच्या शिवाजीनगर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण यांनी जमिनीच्या वादातून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप निवृत्त विंग कंमाडर अरूण देशमुख यांनी केलाय. विनायक निम्हण आपली जागा बळकावत असल्याचा आरोप अरूण देशमुख यांनी केलाय. अरूण देशमुख यांचा साई पार्क बाणेर येथे सर्वे नंबर 39 मध्ये बांधकाम सुरू आहे.

 

ते बांधकामाच्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना रस्ता बंद करण्याचं कुंपण दिसून आलं. ते कुंपण ओलांडून अरूण देशमुख यांनी आपल्या जागेत प्रवेश केला. तेवढ्यात तिथं आमदार विनायक निम्हण आले आणि त्यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप देशमुख यांनी केलाय. अरूण देशमुख यांनी विनायक निम्हण यांच्या विरोधात औध पोलीस चौकीत तक्रार दिली. तर निम्हण यांनी अरुण देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. दरम्यान, रात्री उशिरा विनायक निम्हण, सनी निम्हण आणि निम्हण यांचा ड्रायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Parag Deshmukh

    I want your help for my personal cyber problem. please help me out .Please inform me
    how to reach you?

    • mahesh natu

      what is the problem dear 9930486363

close