गर्भवती महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

July 9, 2013 9:42 PM0 commentsViews: 145

KALYAN_MURDER309 जुलै : कल्याणमध्ये गर्भवती महिलेची हत्या करणार्‍या दोघांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केलीय. कल्याणमधल्या आधारवाडी परिसरातील एका इमारतीत रंगकाम करणार्‍या मजुरांनीच चोरीच्या उद्देशानं या महिलेची हत्या केल्याचं उघड झालंय. घरातील दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन ते फरार झाले होते. पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अब्दुल अंसारी आणि मोहम्मद युसुफ या दोघांना अटक केली. तर रॉबीन अँथनी हा तिसरा आरोपी अजून फरार आहे.

close