मायकेल नॉब्ज यांची हकालपट्टी

July 9, 2013 9:55 PM0 commentsViews: 77

mical nobz09 जुलै : भारतीय हॉकी टीमच्या कोचपदावरुन मायकेल नॉब्ज यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गेल्या वर्षभरात भारतीय टीमच्या निराशाजनक कामगिरीमुळे नॉब्ज याची हकालपट्टी करण्यात आली आहे.

 

जून 2011 मध्ये नॉब्ज यांची भारतीय टीमच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा 5 वर्षांचा करार होता. मात्र करार संपण्यास तीन वर्ष बाकी असतानाच त्यांना हटवण्यात आलंय. नॉब्ज यांच्या कार्यकाळात 2012 ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमवर सर्व मॅच गमावण्याची नामुष्की ओढावली होती. तर गेल्या महिन्यात झालेल्या हॉकी वर्ल्ड लीगमध्येही भारताला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

close