सोलापुरात काळवीटाची शिकार, 3 अटकेत

July 9, 2013 9:57 PM0 commentsViews: 193

solapure kalvit09 जुलै : सोलापूर जिल्ह्यात काळवीटाची शिकार झाल्याचा प्रकार समोर आलाय. मोहळ तालुक्यातील वटवटे वाघोली शिवारात काळवीटांची बंदूकीनं शिकार करण्यात आलीय. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. हे तिन्ही आरोपी कोल्हापूरचे रहिवाशी आहेत. विक्रम पाटील, माधव यादव आणि रणजीत जाधव असे आरोपीची नावं आहेत. या तिघांना व्हनमाने वस्तीजवळ अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळ दोन जिवंत काडतूस आणि जिप ताब्यात घेतली आहे. त्यांच्यासोबत असलेला सर्जेराव पाटील आणि स्थानिक मजूर रायफलींसह फरार झालेत. या पाच जणांच्या विरोधात कामती पोलीस स्टेशनला वन्यप्राणी संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

close