दुधात भेसळ करणारी टोळी रंगेहात पकडली

July 9, 2013 10:37 PM0 commentsViews: 218

09 जुलै : मुंबईतल्या कांदिवली भागात दुधात भेसळ करणार्‍या एका टोळीला समता नगर पोलिसांनी रंगेहात पकडलंय. विविध नामांकित ब्रँडच्या दुधात भेसळ केली जात होती. पोलिसांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला छापा टाकून भेसळ करणार्‍यांना रंगेहात पकडलं. या टोळीकडून 15 हजार 400 रूपये किंमतीचं 415 लिटर भेसळ केलेलं दूध आणि यासाठी लागणारं साहित्य जप्त केलंय.

close