संक्रमण शिबिरातल्या घरांच्या भाड्यात घट

January 20, 2009 6:18 AM0 commentsViews: 4

20 जानेवारी, मुंबईमुंबईतल्या संक्रमण शिबिरांतल्या घरांचं भाडं 1700 वरुन 500 रूपये करण्यात आलं आहे. पालकमंत्री नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. आता यापुढे म्हाडाकडून मुंबईतल्या 56 संक्रमण शिबिरातील घरांचं भाडं पाचशे रुपये इतकं माफक आकारलं जाणार आहे. समुद्रांच्या लाटांमुळं किना-यावरील इमारतींना धोका पोहोचतो. त्यामुळे कुलाब्यापासून माहीम कॉजवेपर्यंत सिमेंट काँक्रिटचे टेट्रापॉड बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी 107 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलाय. मुंबईतील शालेय शिक्षण आणि झोपडपट्टी पूनर्वसनासाठी 64 कोटी रुपयांचा वेगळा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

close