राज ठाकरेंनी घेतली गृहमंत्री पाटील यांची भेट

January 20, 2009 4:35 AM0 commentsViews: 2

20 जानेवारी मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गृहमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबईची दिवसरात्र सेवा करण्या-या पोलिसांना म्हाडाची घरं प्राधान्यानं द्यावी, अशी मागणी गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. राज ठाकरे आणि गृहमंत्री जयंत पाटील यांची सुमारे 25 मिनिटं ही चर्चा चालली. यात प्रामुख्यानं दोन मुद्यांवर चर्चा झाली. पहिला मुद्दा म्हणजे पोलिसांना म्हाडाची घरं देण्यात यावी तर दुसरा मुद्दा मुंबईमध्ये रेशन कार्ड नसलेल्या टॅक्सी चांलकांना दिलेल्या लायसन्सची चौकशी व्हावी अशीही मागणी ठाकरेंनी केली.

close