अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला वारकर्‍यांचा विरोध

July 10, 2013 1:15 PM6 commentsViews: 596

10 जुलै :अंधश्रध्दा निर्मूलन विधेयकाला वारकर्‍यांनी विरोध केला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात सरकारनं हे बिल पास करू नये, असं वारकर्‍यांचं म्हणणं आहे. तर नरेंद्र दाभोलकरांनी चर्चेसाठी पंढरपुरात यावं असं आवाहनही वारकर्‍यांनी केलंय. सरकारने आमच्या प्रश्नांची 14 जुलै पर्यंत उत्तर द्यावीत नाहीतर पालख्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आंदोलन करणार, असा इशाराही वारकर्‍यांनी दिला.

 • Pratibha Babar

  शिवणीकर तुह्माला कोण ओळखतो … …
  श्याम मानव नरेंद्र दाभोलकर हि मंडळी जागतिक दर्जेची मंडळी आहेत
  लोकांना देवाच्या नाडी लावून पैसा उकलण्याचा धंदा ब्राह्मणांकडून आता वारकर्या कडे आला कि काय
  लोकांना वेडे बनविणे सोडून द्या ……
  संत तुकाराम महाराज्यांचा खून केला आणि तुह्मी म्हणता ते विमानात बसून वैखुन्ठी गेले
  रेडा बोलू लागला …. आहो त्या साठी पाध्येला भेटा ते अश्या बर्याच बाहुल्यांना बोलते करतात …

  • Satish Kochrekar

   जागतिक दर्जाची मंडळी ? आधी महाराष्ट्रात असलेला एखादा सामान्य माणूस तरी दाभोलकर आणि शाम मानव यांना ओळखतो का ते अगोदर शोधा ……आणि जाती वाचा टीका कसली करताय ? जातीवाचक अपमानास्पद बोलण्याचा अधिकार फक्त दलितांनाच दिला आहे का ? उगाच तोंड आहे म्हणून बोंबा मारायच्या ..आणखी एक ….या प्रतिक्रियेवरून हा कायदा ब्राम्हणांना जास्त हानी कारक आहे असेच वाटते. त्यामुळे एखाद्या जातीला जर हा हानिकारक असेल तर तो नक्कीच व्हायला नको…

 • Satish Kochrekar

  शासनाला दुसरी महत्वाची
  कामे शिल्लक नाहीत का ? असा प्रश्न यावर विचारावासा वाटतो. आज भिकेला लागलेले
  महाराष्ट्र सरकार निवडणुका जवळ येऊ लागताच काय वाट्टेल ते करा आणि शाबासकी मिळवा
  असे वागायला लागले आहे. दुष्काळाच्या सावटातून हे राज्य कसेबसे सावरत आहे.
  महागाईने सर्व सामान्यांचे जगणे हराम झाले आहे. असले अनेक प्रश्न असतांना असली
  फुटकळ विधेयके आणून सरकार काय साध्य करणार आहे ते समजत नाही. सरकारच्या
  मंत्र्यांना एकाच सांगावेसे वाटते, बाबांनो आता दया करा आमच्यावर आणि ज्यामुळे
  जनतेचे आणि राज्याचे कल्याण होईल. अशा प्रश्नांवर विचार करा. शेतकरी आणि कामगार
  सुखी होईल. असली काही विधेयके आणून ती पारित करून घ्या. नाहीतर जनतेचा शाप आणि
  अंधश्रद्धेच्या कायद्याचे भूत तुम्हाला निवडणुकीत धूळ चारल्याशिवाय रहाणार नाही.

 • Satish Kochrekar

  जे शासन लोकल ट्रेन मधल्या
  बंगाली बाबांच्या जाहिराती थांबवू शकत नाही ते म्हणे अंधश्रद्धा दूर करणार !!
  शासन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात कायदा करत आहे, हे वृत्त वाचले आणि धक्काच बसला. कारण
  अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे शासन अंधश्रद्धा कसे काय दूर करणार. मी दररोज ट्रेन
  ने प्रवास करतो. आणि याच मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये भूत, करणी, भानामाती याच्या
  जोडीला प्रेम, वशीकरण वैगरे सारख्या अमानवी गोष्टींचा सहभाग असलेल्या बंगाली बाबांच्या जाहिराती सहज बिन दिक्कत लावलेल्या
  असतात. या लोकांवर फसवणुकीचा आरोप दाखल करण्या इतपत माहिती पोलिसांकडे असते. त्या
  ठिकाणी त्या बंगाली बाबाचा पत्ता आणि फोन नंबर सुद्धा असतो. पण आता पर्यंत किती
  बाबांना पोलिसांनी अटक केली आहे ? त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
  आहे ? सध्याच्या कायद्यातल्या कलमांचा वापर शासन करत नाही. ठोस पावले उचलत नाही.
  आणि त्यात हा नवीन कायदा करून काय साध्य होणार ते समजत नाही. अगोदर आहे त्या
  कायद्यांचा योग्य तो वापर करायला शिका आणि मग नवीन कायदे आणा.

 • Satish Kochrekar

  कायदा हाताशी धरून अंधश्रद्धा निर्मुलन करताना कोणाच्याही धार्मिक भावना
  दुखावल्या जाणारा नाहीत याची जबाबदारी शासन घेऊ शकेल का ? याचे उत्तर ‘नाही’ असेच
  द्यावे लागेल. मुळात जिथे श्रद्धेचा प्रश्न आड येतो तिथे सरकार ने सामंजस्यानेच
  वागणे जास्त परिणामकारक ठरते. मागील वर्षी होळीचा सण असताना ‘होळी लहान करा , पोळी
  दान करा’ अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांनी केली होती. त्यांच्या दृष्टीने
  पूर्ण पोळी होळीत टाकणे हि अन्नाची नासाडी झाली पण ज्याची श्रद्धा आहे. त्याच्या
  दृष्टिने तो नैवद्य होळीत अर्पण करणे , हा
  त्याच्या श्रद्धेचा भाग झाला. उद्या असले
  कायदे आल्यावर ‘होळीत नैवद्य अर्पण करणे हि अंधश्रद्धा आहे. त्यामुळे हि प्रथा बंद
  करा.’ असा या कायद्याच्या आधारे शासनाने आदेश काढला. आणि विरोध करायला पोलीस गेले
  तर लोक ऐकतील ? मग नंतर उसळणार्या जनक्षोभाला कोण जबाबदार असणार ? त्यामुळे समाजाला
  नुकसान न पोह्चावानार्या धार्मिक बाबतीत सरकारने न पडलेले जास्त चांगले !!

 • Satish Kochrekar

  अंधश्रद्धा निर्मुलन कायदा करण्यासाठी शासन सरसावले आहे. मी नियमित वर्तमान
  पत्रे वाचतो. आणि वृत्त वाहिन्या वरचे कार्यक्रम न चुकता पहातो. पण सध्या नरबळी
  किंवा तत्सम गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या काही मोठ्या प्रमाणात दिसूनही येत नाहीत.
  एक दोन प्रकारणे वाचनात आली, पण त्या
  प्रत्येक प्रकरणामध्ये गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांना शिक्षा
  सुद्धा
  झाली आहे. मग ज्या गोष्टीचा समाजाला नगण्य उपयोग आहे असले कायदे करून सरकार
  वेळ का
  वाया घालवत आहे. आज
  पोरीबाळी नराधमांच्या वासनेला बळी पडत आहेत. तिथे यांचे कायदे फिके कसे
  पडतात. असलेल्या कायद्यात योग्य त्या सुधारणा करून तेथे कडक शिक्षेचा
  अवलंब का नाही केला जात. आज कायदा
  करून राजरोस घडणारे बलात्कार तुम्ही रोखू शकत नाही आणि नव नवीन कायदे
  बनवताय ? इतकाच
  जर हा प्रश्न गंभीर आणि जिकरीचा झाला आहे,
  तर अंधश्रद्धेपोटी घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण तरी किती आहे हे सर्वाप्रथम
  शासनाने स्पष्ट करावे. आणि मगच नवीन कायद्याच्या मागे लागावे. नाहीतर दोरीला साप
  समजून म्हणून भुई धोपटल्यासारखी सरकारची अवस्था झाली आहे. असेच म्हणावे लागेल.

close