बीडमध्ये दलित महिलांची धिंड

January 20, 2009 7:00 AM0 commentsViews: 1

20 जानेवारी, बीडगणेश नवलेबीडमधील केज तालुक्यात दोन दलित बहिणींना मारहाणीची घटना घडलीये. सोमवारी रात्री मारहाणीची घटना घडली. केजमधील्या सिंदी येथे या दोन बहिणींना मारहाण करून त्यांची गावातून धिंडही काढण्यात आली. या प्रकरणात 9 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. ज्या दोन बहिणींच्याबाबतीत ही घटना घडली त्या शेतातून काम करून रात्री घरी परतत होत्या. त्यावेळी त्यांना 9 गावगुंडांनी गाठलं. दोघींना जातीवरून बोलायला सुरुवात केली. या दोन बहिणींनी अत्याचाराविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. तेव्हा पोलिसांनी 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. जगन्नाथ जाधव, भारत जाधव , तुकाराम जाधव, कैलास देशमुख, माणकराव देशमुख आणि निंबाभाई देशमुख यांच्यासह अन्य तीन जणांवर पोलिसांनी ऍट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारांवर विनयभंग करणं, मारहाण करणं हेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close