‘एक बंदर स्विमिंग पूल के अंदर’

July 10, 2013 8:44 PM0 commentsViews: 476

10 जुलै : गेल्या आठ दिवसांपासून मुंबईतल्या मुलुंडच्या जलतरण तलावात एक मजेशीर दृश्य बघायला मिळतंय. इथं एक पाहुणा आंघोळीसाठी येतो आणि त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमते. हा पाहुणा आहे एक लंगूर जातीचं माकड. हे माकड मुलुंडच्या जलतरण तलवात येतं आणि चक्क पोहण्याचा सराव करतं. दोन तीन दिवस त्यानं आधी इथं पोहताना लोकांचं निरीक्षण केलं आणि मग त्यांचं अनुकरण करत स्वत:ला पाण्यात झोकून दिलं. आता हे माकड दररोज येऊन मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतं आणि आल्या पाऊली परत संजय गांधी अभयारण्यात निघून जातं. आधी या माकडाला इथले लोक घाबरले, आता मात्र या पाहुण्यासोबत सर्वांची गट्टी झालीय.

close