कर्नाटक परिवहनच्या बसवर कोल्हापुरात दगडफेक

January 20, 2009 12:40 PM0 commentsViews: 2

20 जानेवारी, कोल्हापूरप्रताप नाईकसीमाप्रश्नावरून कोल्हापूरमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूरमध्ये कर्नाटक परिवहनच्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त जमावानं बसवर दगडफेक केलीये. या संतप्त जमावात 50-60 लोक असून ते शिवसेनेचे आहेत. 15 जानेवारीला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड केली होती. त्यामुळे लातूरमध्ये कर्नाटकची बस जाळण्यात आली होती. तसंच पुण्यातही कर्नाटकच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती. परिणामी कर्नाटकच्या, महाराष्ट्रात येणार्‍या बस रद्द करण्यात आल्यात. कर्नाटक परिवहननं हा निर्णय घेतलाय. कर्नाटकच्या महाराष्ट्रात येणा-या 185 बस रद्द करण्यात आल्या आहेत.असं असूनही कोल्हापूर जवळून जाणा-या कर्नाटक परिवहनच्या लांबपल्ल्याच्या बस वर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या लांबपल्ल्याच्या बस कावळा नाकाकडून चालल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. त्यामुळे बस न थांबता पुढे गेली आहे. बसवर केलेल्या दगडफेकीमध्ये कोणाला लागलंय हे काही कळलं नाहीये. हा हल्ला पाहता तिथे पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या कावळा नाका इथे असणा-या ताराराणी चौकातून बेळगाव, निप्पाणीकडे जाणा-या बस सुटतात. पण सीमाप्रश्नामुळे कर्नाटक परिवहनानं बस रद्द केल्या आहेत. त्यामुळे बेळगाव, निप्पाणीकडे जाणा-या प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

close