लक्ष्मण मानेंना जामीन मंजूर

July 10, 2013 5:07 PM0 commentsViews: 351

Image img_235092_laxamanmane4_240x180.jpg10 जुलै : बलात्काराच्या आरोपावरुन अटकेत असलेले साहित्यिक लक्ष्मण माने यांना अखेर सातारा न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. लक्ष्मण माने यांच्यावर आश्रमशाळेतल्या महिला कर्मचार्‍यांवर बलात्कार केल्याचे सहा गुन्हे नोंदवण्यात आले होते. यानंतर माने यांना अटक करुन पोलीस कोठडी देण्यात आली होती.

गेल्या दोन महिन्यांपासून लक्ष्मण माने अटकेत होते. मानेंवर आश्रम शाळेत कर्मचारी असलेल्या सहा महिलांवर बलात्कार केल्याचे सहा गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अनेक वेळा पोलीस कोठडी मिळाली होती. गेली दोन महिने पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. दरम्यानच्या काळात मानेंनी जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले असताना न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. मानेंवर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर 15 दिवसांनी म्हणजेच 8 मे रोजी ते पोलिसांना शरण आले होते.

close