देवा आम्हाला माफ कर,तुझी सुरक्षा तूच कर !

July 10, 2013 10:37 PM4 commentsViews: 753

सुनील पुढारी आणि मोहीत महालेसह शोएब अहमद, मुंबई

10 जुलै : बोधगयेत महाबोधी मंदिरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे देशातल्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आमच्या सीएनएन आयबीएनच्या टीमनं देशातल्या वेगवेगळ्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. या पाहणीत जे समोर आलं ते अत्यंत काळजी करणार आणि धक्कादायक आहे. ज्या देवाकडे मोठा आशेनं भक्त आपली गार्‍हाणं घेऊन जातो पण त्या भक्ताची सुरक्षा तर दूरच पण देवा तुझी सुरक्षा तूच कर असं म्हणण्याची वेळ आली आहे.

मुंबईतल्या धार्मिक स्थळांची सुरक्षाही फारशी चांगली नाही. निकामी मेटल डिटेक्टर आणि फक्त 3 पोलीस कॉन्स्टेबल…एवढी तोकडी सुरक्षा व्यवस्था आहे मुंबईतल्या प्रसिद्ध हाजीअली दर्ग्याची..

स्टीलचा टीफिन बॉक्स. स्फोटकं ठेवण्यासाठी अशा टिफीन बॉक्सचा अनेकदा वापर करण्यात आलाय. हा टिफीन आमच्या प्रतिनिधीने बॅगेत ठेवून हाजीअलीत प्रवेशद्वारावर पोहचला. पहिले तर तो मेटल डिटेक्टरमधून आत गेलाा. पण, ते निकामी होतं. मेटल डिटेक्टरजवळ असलेल्या कॉन्स्टेबलनं बॅग बघितली पण, टिफीन बॉक्स चेक केला नाही. यानंतर आम्हाला एकही कॉन्स्टेबल दिसला नाही. दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरही कुणीच नव्हतं. आम्ही आतल्या भागात गेलो आणि बॅग ठेवली. पण, जवळपास 20 मिनिटं बॅगेकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही.

मुंबईतल्या महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिरांमध्ये मात्र आमच्या बॅगची व्यवस्थित तपासणी झाली. पण, चैत्यभूमीवर कसलीच सुरक्षा नव्हती. इथे मेटल डिटेक्टर होते. पण, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कुणीच नव्हतं.

मुंबईनं अनेक मोठे अतिरेकी हल्ले बघितलेत. पण, तरीही इथल्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याचं आमच्या पाहणीत आढळलंय.

दरम्यान, ही बातमी दाखवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सीएनएन आयबीएनकडून सविस्तर माहिती मागवलीय. सुरक्षेतल्या त्रुटीसाठी जो कुणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा कडक करण्यासाठी पावलं उचलत असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही धार्मिक स्थळांना सुरक्षा पुरवणार असल्याचं म्हटलंय.

 • Aakashhiwale

  Aakashhiwale – mumbai
  kisi ne hume aashiq kaha, kisi ne hume diwana kaha…. in aankhon me aansu tab aaye, jab apno ne hume begana kaha…. mar dalo jo budhke khilap ho jaye

 • Aakashhiwale

  Aakashhiwale – mumbai
  gum is kadar mila ki gabhra ke pi gaye, khushi thodi si milli to mila ke pi gaye, yun to na thi janam se pine ki aadat, sharab ko tanha dekha to taras kha ke pee gaye.

 • Aakashhiwale

  Aakashhiwale – mumbai
  khmoash fiza thi koi saya bhi na tha, is shaher mai koi aaya bhi na tha, kis jurm me chini gayi hasi meri, hamne to kisi ka dil dukhyabhi na tha.

 • Aakashhiwale

  mera har lamha tumhare hi naam hoga ab ye jeevan bhi tumpe hi qurban hoga tere har gum ko sine mein chhupa lunga aakhiri waqt mein labo par tera hi naam hoga. बोधगया एखाद्या तिर्थक्षेत्राप्रमाणेच पुजनिय आहे.

close