सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढवणार

January 20, 2009 9:13 AM0 commentsViews: 108

20 जानेवारी सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. यांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी केली. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही हे घोषित केलं होतं. त्यामुळेच आता बारामतीमधून सुप्रिया सुळेच निवडणूक लढवणार हे नक्की झालं होतं. फक्त त्यांची औपचारिक घोषणा आता करण्यात आली. सद्या सुप्रिया सुळे राज्यसभेच्या खासदार आहेत. तर दुसरीकडे असंही म्हटलं जातं की शरद पवारांनी खासदारकीची निवडणूक शिरूर मतदार संघातून निवडणूक लढवावी असा स्थानिक कार्यकर्त्याचा आग्रह आहे. नव्या मतदार फेररचनेत बारामती मतदार संघ आता बारामती आणि शिरूर असे दोन मतदार संघात विभागला गेला आहे.

close