7/11 बॉम्बस्फोटाची न्यायालयीन लढाई

July 11, 2013 3:13 PM0 commentsViews: 407

7 11 blastसुधाकर काश्यप,मुंबई

 

11 जुलै : मुंबईत 11 जुलै 2006 ला लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट मालिका घडली होती. त्या बॉम्बस्फोटात शेकडो लोक ठार झाले होते. सात ठिकाणी हे बॉम्ब ब्लास्ट झाले होते. या घटनेला आता सात वर्षं पूर्ण होत आहे. पण या सात वषांर्त बॉम्बस्फोटांचा खटला अजूनही सुरूच आहे.

 

11 जुलै 2006 .. वेळ संध्याकाळ सहाची … त्या दिवशी मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकल ट्रेन्समध्ये 7 बॉम्बस्फोट झाले. शहराला आणि देशाला हादरवून टाकणारी ही घटना होती. या प्रकरणात आता पर्यत एटीएसने 13 जणांना अटक केलीय. मुंबई सेशन कोर्टात खटला सुरु आहे. सुरुवातीला अटक झालेल्या आरोपींनी अनेक गोष्टींसाठी कोर्टात धाव घेतल्यामुळे हे प्रकरण लांबल. त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून हा खटला नियमित सुरु आहे.
 

 

7/11 मुंबई स्फोटांतले आरोपी
– कमाल अन्सारी
– डॉ. तन्वीर
– एहतेशाम सिद्दिकी
– मोहम्मद अली
– वादीज
– वाहिद्दीन मोहम्मद
– मुझम्मिल
– फैझल
– आसिफ बशीर शेख

अशा 13 जणांना अटक केलीय. पण प्रत्यक्षात तेे तिथे नव्हतेच असा त्यांच्या वकिलांचा दावा आहे.

या प्रकरणात आतापर्यंत सरकारी पक्षाने सर्व साक्षी पुरावे कोर्टासमोर मांडलेत.आता आरोपीच्या वतीने साक्षी पुरावे कोर्टासमोरं मांडण सुरु आहे. मुंबईत आतापर्यंत अनेक बॉम्बस्फोट झालेत. पण इतर कोणत्याही प्रकरणात एवढी कोर्टकचेरी झाली नाही. त्यामुळे सात वर्षांनंतरही हे प्रकरण सुनावणी स्तरावरच रखडलंय.

close