ठाण्यातल्या मनसेच्या पदाधिका-यांना नोटिस

January 20, 2009 6:55 AM0 commentsViews: 1

20 जानेवारी ठाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 24 जानेवारीला ठाण्यात सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या ठाण्यातल्या पदाधिका-यांना ठाणे आयुक्तालयातर्फे नोटिस बजावण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांच्याआधी झालेल्या सभांचा अनुभव लक्षात घेऊन सेक्शन 149 अंतर्गत त्यांना या नोटिस बजावण्यात आल्या आहेत. ज्या दिवशी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा आहे त्याच दिवशी उत्तरप्रदेश दिन आहे. सभेत किंवा सभेनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी कोणतीही घटना घडल्यास, त्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच हा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.

close