अखेर जात पंचायतीविरोधात गुन्हा दाखल

July 11, 2013 1:01 PM0 commentsViews: 136

NSK INTERCAST BYCOT.tran11 जुलै : नाशिकमध्ये जात पंचायतीचा प्रकार उघड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र जात पंचायतीचा जाच ज्या गरड कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला. त्या कुटुंबीयांची तब्बल चार दिवसानंतर दिवसांनी लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

जात पंचायतीच्या जाचाला कंटाळलेलं हे कुटुंब गेल्या चार दिवसांपासून लासलगाव पोलिसांचे उंबरठे झिजवत होतं. दुसरीकडे पुण्यातल्या बिबवेवाडीमध्ये गौड ब्राह्मण कुटुंबाची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नाही. शेवटी पोलीस आयुक्तांकडे त्यांना धाव घ्यावी लागली. दुसरीकडे पोलीस या तक्रारदारांवरच दबाव आणत असल्याचं पीडित कुटुंबांचं म्हणणं आहे.

close