सीमाप्रश्न सुटत असेल तर युती तोडा- गडकरी

January 20, 2009 12:51 PM0 commentsViews: 4

20 जानेवारी मुंबईकर्नाटक सीमाप्रश्नावरून भाजप आणि शिवसेनेतला वाद पेटू लागला आहे. युती तोडल्यानं सीमाप्रश्न सुटत असेल तर युती तोडा,असं आव्हान भाजप नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेला दिलंय. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू झाली त्यावेळी ते बोलत होते.सीमाप्रश्नावरून रामदास कदम यांनी भाजपशी युती तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रत्येक शिवसेना नेते युती तोडण्याची भाषा करत होता. भाजपनेही सीमाप्रश्नाबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडे सीमा प्रश्न नेण्यासाठी पाठिंबा दिला होता.तसंच आत्तापर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली होती. पण आता भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी युती तोडल्यानं सीमाप्रश्न सुटत असेल तर युती तोडा असं म्हटलं आहे.

close