राष्ट्रवादीत खा.वंदना चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

July 11, 2013 1:44 PM0 commentsViews: 1197

vandana chavan11 जुलै : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या पदाच्या राजीनाम्याची मागणी काही नाराज नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहुन केली आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. शिवाय डिपॉझिट जप्त झालं. या नामुष्कीला वंदन चव्हाण जबाबदार आहेत असा थेट आरोप नाराज गटाचं नेतृत्व करत असलेल्या शंकर केनसे या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला आहे. काही दिवसांपुर्वी पुण्यातील टेकड्यांच्या बांधकामाच्या मुद्द्यावरुनही वंदना चव्हाण यांना राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांकडून लक्ष करण्यात आलं होतं.

close