वाळू माफियाचा तलाठ्यांवर हल्ला

July 11, 2013 4:52 PM2 commentsViews: 423

11 जुलै : सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातल्या शेवरे इथं तहसिलदार रमेश शेंडगे यांनी धाड टाकली असता मुजोर वाळू माफियांनी त्यांच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात तलाठ्यांच्या सात दुचाकी गाड्या जाळल्यात. तहसिलदार रमेश शेंडगे तीन विभागीय अधिकारी आणि 18 तलाठी तसंच महसूल कर्मचार्‍यांनी हा धाड टाकली होती. पोलीस बंदोबस्त मिळू शकला नसल्यानं हा हल्ला झालाय. या हल्ला विरोधात महसूल कर्मचार्‍यांनी जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरु केलंय.
 

  • Suryakant Dikole

    sarw walu mafia he kontya na konatya rajakiya pakshache karyakarte kinwa pudhari aslyane walu mafiya babat dharal tar chawatay an sodal tar palatay ashi police aani mahasulchi gat aahe.

  • संतोष कांबळे

    वाळू माफियांच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे
    लोकमत चे मनापासून आभार

close