जयप्रभा स्टुडिओचा ताबा लतादीदींकडेच !

July 11, 2013 6:24 PM0 commentsViews: 371

jayprbha studio11 जुलै : कोल्हापुरात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला जयप्रभा स्टुडिओचा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्ह आहे. भालजी पेंढारकर यांचा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओची जागा सरकारनं ताब्यात घेण्याची भारतीय चित्रपट महामंडळाची याचिका जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलीय. त्यामुळे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांच्याच ताब्यात राहणार आहे. भालजी पेंढारकर यांच्या मालकीनंतर ही जागा लतादीदींच्या मालकीची झाली होती.

 

मात्र हा ऐतिहासिक स्टुडिओ पाडून मंगेशकरांनी तिथं व्यावसायिक इमारती उभारण्याचं ठरवलं.  अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं त्याला तीव्र विरोध केला. या स्टुडिओची व्यावसायिक कारणासाठी विक्री होऊ नये, तसंच ही वास्तू सरकारनं ताब्यात घ्यावी या मागणीसाठी महामंडळानं लता मंगेशकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळलीय. दुसरीकडे याच जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला असून सरकारने कोल्हापूर शहरातल्या हेरिटेज वास्तू्‌ंची अंतिम यादी पाठवण्याचा आदेश महापालिकेला दिलाय.

close