राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय लवकरच घेणार- राणे

January 20, 2009 1:00 PM0 commentsViews: 2

20 जानेवारी मुंबईनारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण अजून काँग्रेसमध्ये आहोत असं म्हटलं आहे. तसंच नारायण राणे यांनी पक्षश्रेष्ठींना पुढील निर्णयाबाबत काही अवधी दिला आहे.काँग्रेस मोठा पक्ष असल्यामुळे निर्णय घेताना वेळ लागत आहे. या आधी हायकमांड आणि राज्याचे प्रभारी यांच्यामध्ये आपलं काय बोलणं झालं ते मी सांगू इच्छित नाही. आता पक्षश्रेष्ठींनी चर्चेला बोलावल्यानंतर त्यांना आपलं म्हणणं सांगेन. माझ्या संर्पकात सर्वच पक्षाचे नेते आहेत असा दावाही त्यांनी केला. मात्र आपण बहुजन समाज पार्टीत जाणार नाही असं या पत्रकार परिषदेत म्हणाले.

close