गायब वस्तूंवर ढोबळेंची ‘सफाई’

July 11, 2013 6:18 PM2 commentsViews: 601

11 जुलै : माजी पाणी पुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सरकारी बंगला सोडताना घरातलं सगळं फर्निचर, कॅबिनेटस आणि पडदेही सोबत नेल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारकडे केली. यावर ढोबळेंनी स्पष्टीकरण दिलंय. खातेपालट झाल्यानंतर बंगला मोकळाच होता. तिथे 400 ते 500 कार्यकर्त्यांनी उद्रेक घातला. त्यात सामनाची नासधुस झाली. या सर्व प्रकारबद्दल मी जनतेची जाहीर माफी मागतो आणि सर्व सामान नव्यानं आणून देतो असा माफीनामा ढोबळेंनी सादर केला. गेल्या महिन्यात मंत्रिमंडळातल्या खातेपालटानंतर लक्ष्मण ढोबळेंच पद गेलं होत त्यामुळे त्यांना आपला सरकारी बंगला रिकामा करावा लागला. त्यांच्यानंतर नवे मंत्री मधुकर पिचड यांना घर देण्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं पाहणी केली. तेव्हा इथल्या सर्व वस्तू गायब असल्याची गंभीर बाब लक्षात आली. सोफा, बेड, खुर्च्या, टेबल, गॅस स्टोव्ह, सिलेंडर, किचन व्हेंटिलेटर, एअर कंडिशनर या सगळ्या गहाळ वस्तूंची किंमत जवळपास सात लाख रुपये आहे. या सर्व प्रकरणावर ढोबळेंनी दिलगिरी व्यक्त केली.

  • Lagad

    Ata he Pan Kami Padle Ki kay ?

  • Bhushan

    Are khota boltoy re haaa………

close