मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चार्जशीट दाखल

January 20, 2009 1:10 PM0 commentsViews: 3

20 जानेवारी मुंबईमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चार्जशीट दाखल झालं आहे. याप्रकरणी 11 जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. या 11 जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 12 फेब्रुवारीला आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव इथं मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 6 जण ठार तर 101 जण जखमी झाले होते. हा स्फोट हिंदू अतिरेक्यांनी केल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालं होतं. याप्रकरणी लष्करातील अधिका-यांचाही हात होता. त्यामुळे या बॉम्बस्फोटाच्या तपासानं खळबळ माजवून दिली होती. मालेगावच्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातही पसरल्याचं या तपासात उघड झालं. दरम्यान मालेगांव बॉम्बस्फोटातील आरोपी दयानंद पांडे यानं स्वत:चं नाव दयानंद पांडे असल्याचं नाकारलं. आपल्याला या प्रकरणात विनाकारण गोवल्याचा आरोप त्यानं केला आहे.

close